
- This event has passed.
मराठी भाषा दिवस – २०२३
February 24

२७ फेब्रुवारी हा दिवस सुप्रसिद्ध मराठी कवी आणि कांदबरीकार वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस महाराष्ट्र , गोवा तसेच जगभरात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
आमच्या शाळेत, शुक्रवार , दिनांक २४ फेब्रुवारीला, मराठी भाषा दिवस साजरा केला गेला. इयत्ता ३ री अ आणि ब चे सर्व विद्यार्थी आणि इयत्ता ४ थी चे निवडक विद्यार्थी यांचा यात सहभाग होता. यादिवशी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाची वेळ सकाळी ९.३० ते १०.३० होती. या कार्यक्रमासाठी इयत्ता ३री च्या सर्व पालकांना आमंत्रित केले गेले.
प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणेश वंदना , राजे आले, पालखी सोहळा नृत्य आणि वल्हव रे नाखवा ही चार नृत्य सादर केली गेली.
इयत्ता ३ री अ आणि ब च्या विद्यार्थ्यांनी ‘ दिवाळीराणीचा जयजयकार ‘ हे बालनाट्य सादर केले. चकली, चिवडा, करंजी, लाडू, शेव आणि जिलेबी या पदार्थांच्या रंग, स्वाद आणि रूपावर आधारित हे नाटक होते.
याव्यतिरिक्त कथाकथन, भक्तिगीत, कोडी, अंताक्षरी, समूहगीत, देशभक्तीपर गीत आणि ‘ ळ ‘ ची समृध्दी हे कार्यक्रम सादर केले गेले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
कार्यक्रमाला शाळेतील इतर वर्गातील विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम आणि गोडी निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत गुणांना वाव देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे. हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
धन्यवाद!