St. Josephs Institute

St. Joseph's Institute

(Primary)

Loading Events

« All Events

  • This event has passed.

गुरुपौर्णिमा

July 3, 2023

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते. कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता.

महर्षी व्यासांनी महाभारतासारखा अलौकिक आणि सर्वात श्रेष्ठ असा ग्रंथ लिहीला.त्यांच्या श्रेष्ठत्वाची पूजा करण्याचा हा गुरूपौर्णिमेचा दिवस.

या  वर्षी (३/०७/२३ )सोमवारी गुरुपौर्णिमा होती. त्यानिमित्त शाळेतील  विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, नृत्य, चित्रकला शिक्षिकांनी गुरुपौर्णिमेविषयी माहिती आणि ह्या दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले.

Details

Date:
July 3, 2023