
- This event has passed.
उपक्रम: शब्द वाचा आणि वाक्य सांगा
July 5

इयत्ता : ३ री अ / ब
इयत्ता तिसरीत वाक्यरचना करणे यावर अधिक भर दिला जातो. याची सुरुवात शब्द वाचा आणि वाक्य सांगा उपक्रमाने झाली. प्रत्येक विद्यार्थ्यांला एक शब्द असलेले कार्ड देण्यात आले. त्यानंतर त्यावर आधारित एक वाक्य तयार करून ते वर्गासमोर सादर केले. हा तोंडी उपक्रम होता.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो. तसेच व्याकरण दृष्टीने अचूक वाक्यरचना करण्यास विद्यार्थी शिकतात.